मुंबई महापालिकेत महापौर रस्सीखेच! भाजप-शिंदे युतीत उलट गणित

Share

मुंबई: मुंबई महापालिकेत महापौरपदावर महायुतीत (भाजप–एकनाथ शिंदे शिवसेना) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिंदेसेनेने महापौरपद अडीच वर्षांसाठी हक्काने मिळावे अशी मागणी केली होती, परंतु भाजपने कोणतीही तडजोड न करता महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.

निवडणुकीत भाजपने 137 जागांपैकी 89 जिंकल्या, तर शिंदेसेनेने 90 जागांसाठी लढत 29 जिंकल्या. यामुळे महायुतीला बहुमत काठावर मिळाले आहे. शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना थेट लढतीत 44 प्रभागांपैकी 34 ठाकरेसेनेने जिंकल्या, तर शिंदेंला फक्त 10 जागांवर यश मिळाले.

उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेकडून समृद्धी काते, शैला लांडे, अश्विनी माटेकर यांची नावे चर्चेत आहेत. स्थायी आणि शिक्षण समितीसाठी तृष्णा विश्वासराव, संध्या दोषी, अंजली नाईक यांचाही विचार होऊ शकतो.

मुंबई महापालिकेत महापौर–उपमहापौरपदाची वाटणी यंदा पहिल्यांदाच उलट परिस्थितीत होणार आहे. शिंदेसेनेला उपमहापौरपदावर समाधान मानावे लागणार असल्याने महापालिकेतील सत्तेचा राजकारण आता आणखी तापलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *