रायगड: खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी एका फरार आरोपीला पुण्यातील वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खालिद खलील कुरेशी (वय 23) असे आरोपीचे नाव आहे. राजकीय वैमनस्यातूनच ही हत्या करण्यात आली असून काळोखे यांची कॉन्ट्रॅक्ट किलरने हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आणखी एकजण फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
कुरेशी हा पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगर येथील राहणारा आहे. काळोखे यांचा खून सुपारी देऊनच केल्याची माहिती तपासत उघड झाली आहे. त्यासाठी हल्लेखोरांनी तब्बल 20 लाखांची सुपारी घेतली होती, अशी देखील माहिती आहे. मात्र यासगळ्यात मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांकडून अद्याप सुरू आहे. दरम्यान तपासातील सीसीटीव्ही फुटेज मधील तो अज्ञात आरोपीचा अखेर शोध लागला असून कुरेशीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने काळोखे यांचा दोन मित्रांच्या साथीने खून केल्याची कबुली दिली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचं पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले.
दरम्यान, खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी सकाळी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. शहरातील जया बार समोर ५ जणांनी काळोखे यांचा पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखेंचा जागेवरच मृत्यू झाला. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली असून. ही हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झालंय. ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृणपणे हत्या…