मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या पगारासंदर्भात राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या पगारामध्ये भरघोस वाढ करण्याचा झाली आहे.
विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक, वाहनचालकांच्या मानधनात वाढ झाली असून आता स्वीय सहाय्यकांना आता ४० हजार, वाहनचालकांना ३० हजार मानधन मिळणार आहे. स्वीय सहाय्यक आणि चालकांच्या आधीच्या पगारात दहा हजारांची वाढ झाली आहे. ही पगारवाढ १ ऑगस्ट पासून लागू होणार आहे.

शासनाच्या निर्णयानुसार स्वीय सहाय्यकांचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार करण्यात आले आहे. तर चालकांचे मानधन २० वरून ३० हजार करण्यात आलेले आहे. स्वीय सहाय्यक आणि चालकांची साधारण २५ ते ३० टक्के पगार वाढ झाली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासदंर्भातील घोषणा केली आहे.
दरम्यान, आमदारांचे दैनंदिन कामकाज सांभाळणाऱ्या दोन्ही घटकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने शासनाने हा पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे सगळ्याच आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मोठी बातमी! राज्यातील ५१२ गावांत ओबीसींच्या सरपंचपदांवर कात्री; कारण….
फडणवीस सरकारचा Gen Z साठी डॅमेज कंट्रोल प्लॅन तयार; पाहा प्लॅन…