नवी दिल्लीः आजपासून (शनिवार) सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे दिल्लीतील पालम विमानतळावर आगमन झाले आहे. या परिषदेत ब्रिक्सचे ११ सदस्य, त्यांची मित्रराष्ट्रे आणि काही विशेष पाहुणे एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन शुक्रवारीच (ता. ११) भारतात दाखल झाले आहेत.
भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता ही आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ही संकल्पना ‘मानवता प्रथम’ या भावनेवर आधारित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह इराण, दक्षिण आफ्रिका व इजिप्तचे अध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख जागतिक नेते यात सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेची संकल्पना लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता ही आहे. थोडक्यात ही संकल्पना ‘मानवता प्रथम’ या भावनेवर आधारित आहे.