सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना थांबल्या अन् चावली जीभ…

shaina-nc
Share

मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी लिखित ‘बिलॉन्गिंग- अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या काही प्रती फाडल्या. या पुस्तकातील काही मजकूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा असल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी सगळ्यांदेखत या पुस्तकातील काही पाने फाडली. तेव्हा शायना एनसी यांच्याकडून एक चूक घडली.

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र सर्वांदेखत फाडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर शायना एनसी यांना आता एकनाथ शिंदे यांनी तातडीने बोलावून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्राथमिक माहितीनुसार, शायना एन सी काहीवेळापूर्वीच विधानभवनात पोहोचल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानभवनात बोलावून घेतल्याची माहिती आहे. शायना एनसी यांच्याकडून पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला होता. यासंदर्भातच बोलण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांना बोलावून घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे हे शायना एनसी यांना काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सर्व प्रवक्ते फोटो आणि पुस्तक फाडत असताना शायना एन.सी.यांच्याकडून चुकून बाळासाहेब असलेला फोटोही फाडला गेला. फोटो फाडता फाडता ते लक्षात येताच शायना एन.सी.अर्ध्यावर थांबल्या आणि जीभ चावली. पण यावर वादंग माजल्यानंतर शायना एन.सी. यांनी स्पष्टीकरण देत बाळासाहेबांचा नाही मणिशंकर अय्यरांचा फोटो फाडला असे सांगितले. आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडलाय. एकदा नाही तर 10 वेळा आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडू, अशी प्रतिक्रिया शायना एन. सी. यांनी दिली आहे. आमची पत्रकार परिषद नीट ऐका आणि बघा, विरोधकांकडून खोटा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे, असेही शायना एनसी यांनी म्हटले आहे.

2 thoughts on “सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना थांबल्या अन् चावली जीभ…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!