पुणे: दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या क्षणी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सभेला संबोधित करताना त्या अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दादांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. त्यांच्याच हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, “आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आज त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी आणि अत्यंत भावुक करणारी गोष्ट आहे.” दादांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. दादा तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू असे सुनेत्रा पवार यांनी भावूक होत म्हटले.
दरम्यान, या सोहळ्यातील राजकीय उपस्थितीचीही जोरदार चर्चा रंगली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचे नाव प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आले होते. मात्र, प्रकृतीच्या किंवा अन्य कारणांमुळे शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
‘देवाभाऊ’ पुस्तकाचा सह्याद्री अतिथीगृहावर दिमाखदार प्रकाशन सोहळा!
बारामतीत अजितदादांचा अपघात झाला तिथंच आणखी एक विमान कोसळलं, वेळ तीच वेळ अन् गावही…
अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…
One thought on “अजितदादांच्या पुतळ्याचे भावूक वातावरणात अनावरण! डोळ्यात अश्रू, शब्द जड अन् चर्चा…”