भोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे नगरीय विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमधील एका कार्यक्रमात भाजपच्या महिला नगरसेविका संध्या यादव यांच्या शारीरिक स्वरूपाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
इंदूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 1 मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नर्मदा पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यासह विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला कैलाश विजयवर्गीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात विजयवर्गीय यांनी सुरुवातीला स्थानिक भाजप नगरसेविका संध्या यादव यांच्या कामाचे आणि परिसरातील सक्रिय सहभागाचे कौतुक केले. मात्र त्यानंतर मंचावरील इंदूर-5चे आमदार महेंद्र हार्डिया यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. विजयवर्गीय यांनी, महेंद्रजी, तुम्ही मला दिसलाच नाहीत, असे म्हणत ते नगरसेविका संध्या यादव यांच्या मागे बसल्याचे सांगितले. त्यानंतर संध्या यादव यांच्याकडे पाहून त्यांनी त्यांच्या वजनाबाबत टिप्पणी केली. व्हिडीओमध्ये विजयवर्गीय संध्या यादव यांची चौडाई थोडी वाढली अशा आशयाची टिप्पणी करताना ऐकू येतात. या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि विजयवर्गीयही हसताना दिसले.
View this post on Instagram
संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसने या वक्तव्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक व्यासपीठावर महिला लोकप्रतिनिधींच्या शरीरयष्टी किंवा शारीरिक स्वरूपाबाबत वैयक्तिक टिप्पणी करणे योग्य नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्याकडून स्पष्टीकरण आणि माफीची मागणी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण वादावर भाजपच्या नगरसेविका संध्या यादव यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. विजयवर्गीय यांच्याशी आपले संबंध जुने असून ते कौटुंबिक स्वरूपाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संध्या यादव यांनी विजयवर्गीय यांना वडिलांसारखे मानत असल्याचे सांगितले. लहानपणापासून त्यांनी आपल्याला पाठिंबा आणि काळजी दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
बॉडी शेमिंग को कितना सहज मान लिया है! ये मध्यप्रदेश के कैबिनेट मंत्री हैं एक महिला पार्षद के बारे में कैसी टिप्पणी कर रहे हैं और मंच से खी खी खी @GargiRawat pic.twitter.com/obZNm2f5pR
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) September 21, 2026
भाजपच्या महिला आमदाराबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची घसरली जीभ…
कंगना रनौतची जेन-झींबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य…
वादग्रस्त वक्तव्य! मी आजही सांगतो की नेहरू रंगेल होते, तर ते रंगेलच होते…
भाजपचे माजी आमदार अन् बडतर्फ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल; युवतीवर अत्याचार…
One thought on “Video Viral! भाजप मंत्र्यांची भर कार्यक्रमात नगरसेविकेवर बोलताना जीभ घसरली…”