मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट…

Share

मुंबई : मुंबईत आंदोलन करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर अनेक अटी ठेवल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात कायद्यानुसार रितसर अर्ज करून परवानगी घेणं बंधनकारक असेल, अशी प्रमुख अट न्यायालयाने ठेवली आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं तर त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी सरकारनं घ्यावी, अशा सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारनं योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनाविरोधात निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्यावेळच्या आंदोलनादरम्यान मुंबईतल्या परिस्थितीचा हवाला देत आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या खंडपीठाने मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत हायकोर्टाने म्हटलं की…
* मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यास रोखू शकत नाही
* गेल्यावर्षीच्या घटनांचा दाखला देऊन यावेळी त्यांना रोखता येणार नाही
* ही लोकशाही आहे, एखाद्याला उपोषण करु नको असं सांगू शकत नाही
* जरांगेंच्या आंदोलनात हस्तक्षेप करु शकत नाही
* मनोज जरांगे अजून मुंबईत कुठं आलेत, सध्या तरी तो अंदाजच आहे
* तुम्ही सांगता त्या गोष्टी कायदा आणि सुव्यवस्था राबवणाऱ्या यंत्रणांशी संबंधित
* तुमच्या कयासाच्या आधारावर आम्ही आदेश का द्यावे? आम्ही आत्ता फक्त नोटिसा देऊ शकतो
* आम्ही कोणतीही निरीक्षणं किंवा टिप्पणी आता करणार नाही
* जरांगे जबाबदार व्यक्ती आहेत, आंदोलन करणं त्यांचा मूलभूत हक्क

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 15 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील मराठा समाजाला आज अंतरवालीमध्ये येण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्यावी, तसेच हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर 2 सप्टेंबरच्या जीआरनुसार प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देऊन सातारा आणि कोल्हापूर गॅझेटिअर लागू करावं, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली होती.

सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई आंदोलनावर मनोज जरांगे ठाम असून, त्यांनी राज्यातील समर्थक मराठा आंदोलकांना आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे जरांगे मुंबईकडे कधी कूच करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठ्यांचा मराठ्यांशी संघर्ष झाल्यास एकनाथ शिंदेच जबाबदारः मनोज जरांगे यांचा परखड इशारा

हैदराबाद जीआरनंतर एकही मराठा वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते – जरांगे पाटील

आमच्यापुढे दादागिरी करायची नाही; मुंबईत येतच असतो : मनोज जरांगे पाटील

One thought on “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!