अम्मानः जॉर्डनमधील मुवफ्फाक सॉल्टी हवाई तळावर रात्री झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन लष्करी विमानांचे नुकसान झाले, अशी माहिती ‘सीबीएस’च्या पत्रकार जेनिफर जेकब्स यांनी बुधवारी ‘एक्स’ वाहिनीवर दिली.
‘वॉरहॉग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ए-१० थंडरबोल्ट विमानाला धडक बसल्याने त्याचा एक पंख तुटला, तर अंदाजे आठ एफ-१५ विमानांचे किरकोळ नुकसान झाले. या विमानांची तातडीने दुरुस्ती करून त्यांना पुन्हा सेवेत दाखल करण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.