फडणवीस आणि शिंदे यांचा माज मोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही: मनोज जरांगे

manoj-jarange
Share

सोलापूर: “मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका,” असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठवाड्यात कुणबी समाजाची 4 प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू असून, माढा येथे आयोजित सभेत बोलताना सरकारला थेट इशारा दिला आहे. माढ्यात आगमन होताच समर्थकांनी जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर झालेल्या सुमारे तासाभराच्या भाषणात जरांगे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

जरांगे म्हणाले की, एक वर्षभर मी फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात तर त्यांनी असला कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या अन्नात माती कालवणाऱ्या कोणालाही हा समाज माफ करणार नाही. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका.’

“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना कितीही वळवळ करू द्या, यांचा माज मोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही.” देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी या नोंदी रद्द करण्याचा घाट घातला आहे, असा थेट आरोपही जरांगे यांनी केला आहे.

राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; मनोज जरांगे यांचे उपोषण मागे…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी घेतला टोकाचा निर्णय…

भाजपने शिंदेचा आणि अजित दादाचा बरोबर काटा काढला: मनोज जरांगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *