सुनेत्रा पवार यांचा चेहरा अजितदादांच्या आठवणीने रडवेला अन् भावूक पोस्ट…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (बुधवार) जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल मध्यरात्री अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

पवार कुटुंबीय अजित पवार यांचे विमान जिथे कोसळले त्या गोजुबावी गावातील धावपट्टीजवळ आज सकाळी आले होते. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील, विजया पाटील हे सगळे कुटुंबीय याठिकाणी आले आणि त्यांनी अजितदादांना फुलं वाहत आदरांजली अर्पण केली. सुनेत्रा पवार यांचा चेहरा अजितदादांच्या आठवणीने रडवेला झाला होता. त्यामुळे याठिकाणी भावूक वातावरण तयार झाले होते.

अजितदादांसाठी सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट…
दादा…एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ… आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील… माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…!

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवार यांची मनाला भिडणारी पोस्ट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *