मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचे म्हटले आहे. यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आलेला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे, याचा देखील शोध घेतला जाईल, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आलेली आहे. सध्या या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रफुल पटेल- सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार पार्थ पवार असा अंतर्गत कलह काही दिवसांपूर्वी पाहिला मिळाला होता. याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर ही नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणुक आयोगासोबत प्रफुल पटेल यांनी केलेला पत्र व्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्यावेळी प्रफुल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती तर सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते अशी माहिती लिहिण्यात आली होती. याला चार महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम अद्याप पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही किंबहूना निवडणूक आयोगाला नव्याने पत्र व्यवहार केला आहे की नाही, याबाबत देखील स्पष्टता देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का, याचा शोध राष्ट्रीय अध्यक्षांच्यावतीने घेतला जात आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
सदर प्रकरणावर प्रफुल पटेल म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही, त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचा कुठलेही कारण नाही, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झालेली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सुधारणा पक्षांमध्ये आवश्यक आहे, हे नोटीस येण्याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये माझं मत मी मांडलं. या माझ्या मताचा आणि नोटीसचा कुठलाही संबंध नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी पक्षांतर्गत काही सुधारणा करण्याच्या गरजेचे आहे.’
कोण आहे सच्चिदानंद सिंह?
१) झारखंडचे प्रदेशाध्यक्ष
२) पक्षासोबत १५ वर्षापासून जोडलेले आहेत
३) अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जत येथे डिसेंबर २०२३ मधे सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती
४) २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिंह यांचा समावेश नाही
सच्चिदानंद सिंह यांचे आक्षेप काय…
१) 28 जानेवारीला अजित पवार यांचा मृत्यू झाला त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्यात आली ज्या मधे नव्याने राष्ट्रीय अध्यक्ष निवड होई पर्यंत प्रफुल पटेल जे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे अधिकार असतील असं नमूद करण्यात आलं होतं. आत्ता पर्यंत सुधारित संविधान पक्षासाठी लागू आहे.
२) सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना सर्वाधिकार होते आणि त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक प्रफुल पटेल यांनी बोलावणे गरजेचे होते मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली?
३) राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलवण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिले त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे.
सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजकीय नाट्यात मोठा ट्विस्ट…
अजितदादांसारखी स्टाईल! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सरकारी रुग्णालयात धाड…
अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…
अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका; सुनेत्रा पवार आक्रमक…