तुकाराम मुंडे यांच्या FDAला हायकोर्टाचा मोठा दणका…

tukaram-mundhe
Share

नागपूर: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विभागाला नागपूर उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. वर्धा येथील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ‘गोरसभंडार’वर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत हायकोर्टाने ती रद्द केली आहे. शिवाय, न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर ३१ मे पासून बंद असलेले गोरसभंडार आता पुन्हा सुरू होणार आहे.

नागपूर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने वर्धा येथील गोरसभंडारवर ३१ मे रोजी अचानक धाड टाकत कारवाई केली होती. “संस्थेच्या आवारात आणि निर्मिती प्रक्रियेत पुरेशी स्वच्छता नाही,” असा ठपका ठेवत एफडीएने गोरसभंडारला थेट कुलूप ठोकले होते. प्रशासनाच्या या एकतर्फी कारवाई विरोधात गोरसभंडार संस्थाचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, प्रशासनाने उपस्थित केलेला स्वच्छतेचा मुद्दा आणि केलेली कारवाई न्यायालयात अजिबात टिकू शकली नाही. हायकोर्टाने ही संपूर्ण कारवाईच बेकायदेशीर ठरवली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

दरम्यान, गोरसभंडार ३१ मे पासून बंद राहिल्यामुळे संस्थेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. “गेल्या महिनाभराहून अधिक काळ ही प्रसिद्ध संस्था बंद ठेवण्यात आल्यामुळे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या या बेकायदेशीर आणि घाईघाईने केलेल्या कारवाईमुळे झालेल्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीची भरपाई आता कोण देणार?” असा संतप्त सवाल संस्थाचालकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

गोरसभंडार ही केवळ एक व्यावसायिक संस्था नसून वर्धा आणि विदर्भातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शुद्ध दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेवर झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्येही नाराजी होती. आता हायकोर्टाच्या या ऐतिहासिक निकालानंतर गोरसभंडारचे दरवाजे पुन्हा एकदा ग्राहकांसाठी उघडणार आहेत. या निर्णयामुळे तुकाराम मुंडे यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील ६ मोठ्या हॉटेल्सकारवाई; थेट परवाने रद्द…

तुकाराम मुंढे यांचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका; थेट गोदामाचा परवाना रद्द…

हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे

मोठी खळबळ! तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी 250 कोटींची सुपारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *