मुंबई: ईशा फाउंडेशनच्या सहकार्याने अभिनेता सुयश टिळक याने सद्गुरूंनी तयार केलेल्या ७-मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानासह ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ या एका भावपूर्ण संध्याकाळचे आयोजन केले होते.
६ जुलै २०२६: नेहमीच्या सेलिब्रिटींच्या बैठकींपेक्षा काहीतरी वेगळा आणि सुखद अनुभव देणारा कार्यक्रम म्हणून, लोकप्रिय मराठी अभिनेता सुयश टिळक याने रविवारी जुहू येथील ‘ईशा फाउंडेशन’च्या मुंबई केंद्रात ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ (Beyond the Spotlight) या कार्यक्रमाचे आयोजन केले. संवाद, संगीत आणि आत्मचिंतन यांचा समावेश असलेल्या या खास कार्यक्रमात कलाकार, सर्जनशील व्यक्ती आणि मान्यवर एकत्र आले होते. या कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना केवळ आपण साकारत असलेल्या भूमिकांपलीकडे जाऊन स्वतःच्या आंतरिक आरोग्याशी आणि प्रसन्नतेशी पुन्हा नाते जोडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
संध्याकाळची सुरुवात ‘साउंड्स ऑफ ईशा’च्या भावपूर्ण सादरीकरणाने झाली. यातील ध्यानपूर्ण संगीताने शांतता आणि आत्मचिंतनाचे वातावरण निर्मित झाले. त्यानंतर उपस्थितांना सद्गुरूंच्या ‘मिरॅकल ऑफ माइंड’ ॲपद्वारे पंधरा मिनिटांच्या ध्यान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला, ज्यात त्यांनी ॲपच्या सोप्या पण प्रभावी मार्गदर्शित सरावाचा अनुभव घेतला.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
ईशा फाउंडेशनसोबतच्या आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल बोलताना सुयश टिळक यांनी सांगितले की, सुरुवातीला असलेली उत्सुकता कालांतराने संस्थेशी एका सखोल नात्यात कशी बदलली. ते म्हणाले, “मी सद्गुरूंचे व्हिडिओ पाहायचो आणि त्यांची पुस्तके वाचायचो, पण मी काही आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस नव्हतो. मी खूप व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणारा आणि जगभर एकट्याने प्रवास करणारा (सोलो ट्रॅव्हलर) व्यक्ती आहे. मात्र, अभिनयाच्या प्रवासात मी माझ्या मानसिक आरोग्याकडे आणि स्वतःच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू लागलो होतो. ‘इनर इंजिनिअरिंग’ (Inner Engineering) हा कार्यक्रम केल्यानंतर मला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, ज्यांचे ओझे मी बऱ्याच काळापासून वागत होतो. तेव्हाच मला जाणीव झाली की या पद्धती प्रत्येकालाच मदत करू शकतात; म्हणूनच ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ (Beyond the Spotlight) ही संकल्पना पुढे आली.”
त्यानंतर झालेल्या संवादात उपस्थितांना त्यांच्या विविध भूमिकांच्या पलीकडे जाऊन स्वतःशी पुन्हा नाते जोडण्यास प्रोत्साहित केले. सुयश यांनी धावपळीच्या वेळापत्रकात आणि सार्वजनिक जीवनातील तणावाच्या काळातही काही क्षण थांबून शांतता अनुभवण्याचे महत्त्व, तसेच दैनंदिन जीवनात आंतरिक समतोल जपण्याचे मूल्य यांवर भाष्य केले.
या कार्यक्रमाला मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अपर्णा दीक्षित, दुर्वा साळुंखे, श्याम आणि रेशमी पाठक, पूजा पाटील, किशोरी गोडबोले, समित आणि रेशा राऊत, स्नेहलता वसईकर, पांडुरंग पखाले, चारुल देशपांडे, दीप्ती दांडेकर, मंजिरी पुपाला, बेलिना डो, अश्विन शिवशरण आणि निरंजन जावीर यांचा समावेश होता. या सर्वांनी मनन-चिंतनाच्या या संध्याकाळमध्ये सहभाग घेतला आणि मानसिक स्वास्थ्य व सजग जीवनशैलीला (conscious living) प्राधान्य देणारी अशी ठिकाणे निर्माण केल्याबद्दल आपली प्रशंसा व्यक्त केली.
अभिनेत्री किशोरी गोडबोले यानी आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा आढावा घेत म्हटले, “मी गेली दोन वर्षे सद्गुरुंच्या मार्गदर्शनानुसार शांभवी महामुद्रा साधनेचा सराव नियामितपणे करते आणि त्यामुळे मला सदोदित आनंदी राहण्याचा महामंत्र सापडला आहे.” हा एक वेगळा अनुभव असल्याचे सांगत आणि ध्यानामुळे आपल्याला शांतता मिळते हे मान्य करत, मराठी आणि हिंदी मालिकांमधील अभिनेत्री स्नेहलता वसईकर म्हणाल्या, “मी कोईम्बतूरला जाण्यास उत्सुक आहे आणि सद्गुरूंसोबतचा हा आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी मी लवकरच तिथे पोहोचणार आहे.”
स्वतः ‘ईशा क्रिया’चा (Isha Kriya) गेल्या काही वर्षांपासून सराव करणारे आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेले श्याम पाठक म्हणाले, “हा एक अद्भुत अनुभव होता, जो मला वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळीवरही उपयुक्त ठरेल.” पाहुण्यांमधील संवादांनी संध्याकाळची सांगता होत असताना, ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’मुळे संगीत, सजगता आणि अर्थपूर्ण संवाद यांचा सुरेख संगम घडवून आणणारे एक व्यासपीठ यशस्वीपणे निर्माण झाले.
‘मिरेकल ऑफ माइंड’ (Miracle of Mind) बद्दल…
‘मिरेकल ऑफ माइंड’ हे सद्गुरूंचे एक मोफत ध्यान (meditation) ॲप आहे, जे मानसिक आरोग्यासाठी ७ मिनिटांचे एक साधे ‘गाइडेड मेडिटेशन’ (मार्गदर्शित ध्यान) उपलब्ध करून देते. वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार या ध्यानाचा कालावधी २१ मिनिटांपर्यंत वाढवू शकतात. आधुनिक जीवनशैलीत सहजपणे सामावून घेता येईल अशा प्रकारे तयार केलेले हे ॲप, लोकांना दैनंदिन ध्यानधारणेद्वारे अधिक स्पष्टता, समतोल आणि आंतरिक स्वास्थ्य अनुभवण्यास मदत करते.