उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी VSR विमानात बिघाड…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी विमानात ९ जून रोजी संध्याकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याने विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे,

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांचे खाजगी विमान ९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. या तांत्रिक बिघाडामुळे विमान तब्बल २ तास मुंबई विमानतळावरच थांबवून ठेवावे लागले. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर, संध्याकाळी ५ चे हे विमान रात्री ७ वाजता दिल्लीसाठी रवाना झाले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

विशेष म्हणजे या विमानामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे महायुतीचे दिग्गज नेतेही प्रवास करत होते. सर्व नेते दिल्लीतील एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी रवाना होत असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिघाड झालेले खाजगी विमान हे ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे होते. विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सर्व नेत्यांनी याच ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाने आपला पुढील प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला. या तांत्रिक बिघाडामुळे विमानाला २ तास उशीर झाला असला, तरी सर्व प्रवासी नेते सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे विमान अपघातात बारामतीमध्ये निधन झाले. हे विमान व्हीएसआर कंपनीचे होते. विमानाच्या दर्जावरून आणि काही मुद्यांवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी आरोप केले होते. रोहित पवार यांच्या आरोपामुळे अजित पवारांचा मृत्यू हा घातपात होता का, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली होती. अजित पवारांच्या अपघाताबाबत काही धक्कादायक मुद्दे रोहित पवारांनी उचलत व्हीएसआर कंपनीवर कारवाईची मागणी केली होती. या विमान कंपनीच्या मालकाचे संबंध हे एका राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत असल्याने कारवाई होत नसल्याचा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला होता.

बारामतीत अजितदादांचा अपघात झाला तिथंच आणखी एक विमान कोसळलं, वेळ तीच वेळ अन् गावही…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *