मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय! आठ धडाकेबाज योजना जाहीर…

Devendra-Fadnavis
Share

मुंबई : मराठा समाजासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळतील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मिळणार आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचण येऊ नये आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनाही प्रगतीच्या समान संधी मिळाव्यात यासाठी फडणवीस सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा मिळतात त्या आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आल्या आहेत.

मराठा समाजासाठी लागू झालेल्या ‘त्या’ ८ महत्त्वपूर्ण योजना खालीलप्रमाणे:

  1. शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
  2. मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
  3. माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना
  4. विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना
  5. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना
  6. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी ही पात्र असतील.
  7. ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात.
  8. ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील.

राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; मनोज जरांगे यांचे उपोषण मागे…

मनोज जरांगे यांचे 40 डिग्रीच्या उन्हात उपोषण सुरु; पाहा मागण्या…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी घेतला टोकाचा निर्णय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *