मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी घेतला टोकाचा निर्णय…

manoj-jarange
Share

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला असून अत्यंत आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्याचे जाहीर करत, त्यांनी आगामी 30 मे पासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. यंदाचे उपोषण हे नेहमीसारखे सावलीत किंवा फॅनखाली नसणार आहे. मे महिन्याच्या या रखरखत्या आणि कडक उन्हात, डोक्यावर छत्र न घेता, पायात चप्पल न घालता आणि अन्न-पाण्याचा एक थेंबही न घेता ते हे ऐतिहासिक उपोषण करणार आहेत.

“सरकारला आतापर्यंत गरजेपेक्षा जास्त वेळ दिला, 29 मे रोजी या आंदोलनाला तब्बल १० महिने पूर्ण होत आहेत; पण सरकारने फक्त आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. आता एकदाचा आरपारचा लढा होईल, एकतर सरकारचा तुकडा पडेल किंवा माझ्या जीवाचा!” अशा अत्यंत तीव्र शब्दांत जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

“माझ्या शरीरात आधीच प्रचंड वेदना आहेत, या कडक उन्हात माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाले किंवा उष्माघाताने बळी गेला, तर त्याला पूर्णपणे राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, हे उपोषण अत्यंत टोकाचे असल्याने मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी अंतरवाली सराटीकडे गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर हालचाली वाढल्या असून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “तुम्हाला मराठ्यांची मते चालतात, मग आरक्षण द्यायला दुटप्पी भूमिका का? ओबीसींनी न्याय मागून मंत्रालय स्थापन केले. मग मराठे आणि कुणबी एक असूनही जीआर का काढला जात नाही? ५८ लाख नोंदी सापडूनही व्हॅलिडेशनचे काय झाले आणि सातारा गॅझेट का लागू केले जात नाही?” असे एकामागून एक बोचरे सवाल करत त्यांनी थेट सरकारला कोंडीत पकडले आहे. जरांगे यांच्या या वज्रनिर्धारामुळे राज्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

भाजपने शिंदेचा आणि अजित दादाचा बरोबर काटा काढला: मनोज जरांगे

…तर धन्याइतका नीच माणूस पृथ्वीतलावर असूच शकत नाही: मनोज जरांगे

मनोज जरांगे यांचं सरकारला पत्र; माझं पोलिस संरक्षण काढा…

मनोज जरांगे नार्को टेस्टसाठी तयार, धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *