महाराष्ट्रातील मुलाने सुरु केली कॉक्रोच जनता पार्टी; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे…

Cockroach-Janta-Party
Share

पुणे: देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. अवघ्या 5 दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 100 लाख (10M) फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. कॉक्रोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकले आहे.

काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय चळवळीसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात, असे सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले. यानंतर ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नव्हती, तर बनावट पदव्या असलेल्यांना उद्देशून होती, असे स्पष्टीकरण सूर्यकांत यांनी दिले. मात्र यादरम्यान, सूर्यकांत यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळाला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके (वय ३०) या मराठमोळ्या युवकाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवले आहे. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे.

अभिजित सध्या अमेरिकेतल्या बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांनी पुणे शहरातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून, आम आदमी पक्षाचे सोशल मिडिया हँडल सांभाळले आहे. आता अभिजीत दीपके कॉक्रोच जनता पार्टीचे ‘संस्थापक आणि समन्वयक’ आहेत. सरन्यायाधीश हे फक्त निमित्त होतं. अनेक वर्षं साचलेला राग कुठूनतरी बाहेर येणारच होता. नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. आम्हाला चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे, असे अभिजीत दीपके म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *