IAS तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५वी बदली; पाहा आता कुठे नियुक्ती…

tukaram-mundhe
Share

मुंबई : IAS तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यातच पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 25वी बदली आहे. मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी दीड महिन्यापूर्वी बदली करण्यात आली होती. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना मुंढे यांची अवघ्या महिन्याभरातच पुन्हा बदली करण्यात आली आहे. शासनाने लवकरात लवकर कार्यभार स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

IAS तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 – सीईओ, वाशिम.
जून 2010 – सीईओ, कल्याण.
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
जून 2023 – सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 – विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय
31 मार्च 2026 – प्रधान सचिवआपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग

तुकाराम मुंढे यांना थेट निलंबित करण्याची मागणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *