बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामती मतदारसंघाचा वारसदार कोण अशा चर्चा रंगल्या आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरूद्ध पवार होणार नाही, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातले सदस्य सांगत आहेत. मात्र दुसरीकडे पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य आता पवार विरूद्ध पवार लढतीचेच संकेत देत आहेत. कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार हे बारामती पिंजून काढत आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मतदारसंघात रोज दौरे करत असून, गाठीभेटी घेत आहेत. जो व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्याला बारामतीकर साथ देतील असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे २०२४ प्रमाणेच २०२९लाही युगेंद्र पवार रिंगणात उतरणार यात शंकाच नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनीही बारामती मतदारसंघात अधिकाधीक वेळ देण्यास सुरूवात केली आहे. लोकांच्या सुखःदुखात ते पोहोचतात, नुकसाग्रस्त भागाची पाहणी करतात. जनता दरबार घेऊन प्रश्नही सोडवण्यावर भर देतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे ते सांगत आहेत. तर कर्जत जामखेडमधून राजकारणात जम बसवलेल्या रोहित पवार यांचीही बारामतीत एन्ट्री घेण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमावेळी भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही, किमान माझ्याकडून तरी ते होणार नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. त्यावर, आमदार रोहित पवार यांनी भूमिका मांडली होती.
सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; नियम काय सांगतो पाहा…
एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
चर्चांना उधाण! बारामतीचा 2029 मध्ये उमेदवार कोण? जय पवार यांनी स्पष्ट सांगितलं…