पुण्यातील कोंढव्याबाबत भाजप पदाधिकाऱ्याचा वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल…

Share

पुणे : पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने कोंढव्याला पाकिस्तान म्हणून संबोधल्याचाआल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपच्या पुणे शहर युवा शाखेच्या खजिनदाराने कोंढव्याला ‘पाकिस्तानचे कराची’ असे संबोधल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर दोन दिवसांनी, कोंढवा पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि कारवाईची मागणी केली. या तीव्र प्रतिक्रियेनंतर, पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली आणि या प्रकरणी एफआयआर दाखल केला. सर्वेश मेहंदळे हा भाजप युवा मोर्चाचा खजिनदार आहे. पोलिसांनी मेहंदळे विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांनी कलम ३५३(२) (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) लावले आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे याने सोशल मीडियावर कोंढवा परिसराचा उल्लेख “पाकिस्तानचा कराची” असा केल्याने पुण्यातील कोंढवा भागात मोठा वाद निर्माण झाला आहे. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी सर्वेश मेहेंदळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश मेहेंदळे यांनी कोंढव्यातील मुख्य रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या इमारतीतून एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये ते हॉस्पिटलच्या बाहेरील कथित अतिक्रमणांबाबत माहिती देत होते. मात्र, या व्हिडिओला त्यांनी “वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान” असे कॅप्शन दिले होते आणि बोलताना या परिसराचा उल्लेख ‘कराची’ असा केला होता. या विधानामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. कोंढवा पोलिसांनी बुधवारी मेहेंदळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. कायदेशीर विनंतीनुसार आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे हे अकाऊंट भारतात उपलब्ध नसल्याचा संदेश संबंधित प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट! भाजपने उघडला पत्ता…

पुणे! भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यावर झाडल्या धडाधड नऊ गोळ्या…

मोठी बातमी! भाजपमध्ये गेलेले आपचे सर्व खासदार होणार अपात्र…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *