अमोल मिटकरी यांची धक्कादायक माहिती; अजितदादांच्या प्रतिमेला दिवाबत्ती करायला गेले अन् समोर…

amol-mitkari
Share

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. विमान अपघाताची चौकशी सुरू असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही नेत्यांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच, आता या प्रकरणाशी ‘काळी जादू’ आणि ‘अघोरी पूजा’ यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही वारंवार करण्यात येत आहे. याचदरम्यान आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत धक्कादायक माहिती दिली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अमोल मिटकरी म्हणाले, ‘काल रात्री अजितदादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता, त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार? भयावह’

अजित पवार यांच्या अपघाताच्या एक दिवस आधी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या बांधकाम साइटवर ‘अघोरी पूजा’ करण्यात आली होती, असा दावा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेमागे काहीतरी अघोरी प्रकार किंवा कट असल्याचा संशय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अजित पवार यांचे विमानात बसण्यापूर्वीचे सीसीटीव्ही अद्याप बाहेर का आले नाहीत. तुम्ही म्हणाला 15 दिवसांत ब्लैक बॉक्स डेटा बाहेर आणू, मग 4 महिने झाले का डेटा बाहेर आला नाही. अशोक खरातचे सीसीटीव्ही गतीने बाहेर येतात, परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात मग अजित पवार अपघाताचे का नाहीत?, बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलिस ठाण्यात आहे. बारामतीत मी मागील 3 दिवस फिरत आहे. बारामतीचे लोक आम्हाला सांगत आहेत, असे अमोल मिटकरी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

अजितदादांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात? नव्या दाव्याने उडाली खळबळ…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *