मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री भेट…

uddhav-thackeray
Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री भेट झाल्याचं वृत्त समोर आले आहे. मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाही. खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला. बैठक झाली का हे दोन नेतेच सांगू शकतील असे राऊत म्हणाले. पण, बातमी खरी असल्याचा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा दावा आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही विधान परिषदेच्या अनुषंगाने भेटल्याचे सांगितले जात आहे, या भेटीबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. तर मध्यरात्री झालेल्या या भेटीत फक्त विधान परिषदेची चर्चा झाली की अन्य कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. बुधवारी मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा केला जात आहे. एका ओळीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. खोटी बातमी पसरवलेली आहे. अशा पद्धतीची कुठलीही भेट झालेली नाही, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यम हॅण्डलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई जाईल, असे भाजपचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून “मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.”, अशी पोस्ट २३ एप्रिल रोजी शेअर करण्यात आली होती. त्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *