मंत्री गिरीश महाजन यांच्यावर महिला एवढी का संतापली; नेमकं कारण काय…

girish-mahajan
Share

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत ठेवले होते, मात्र ते नामंजूर झाल्याने विरोधकांवर हल्लाबोल करत देशभरात निदर्शने केली. मुंबईतील वरळीत देखील भाजपकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान, एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या महिलेनं चक्क मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांनाही चांगलच सुनावले. मात्र, महिलेच्या रागामागे, तिच्या संताप अनावर होण्यामागे दडलेली एका लेकराची आई होती. आपल्या मुलाच्या काळजीपोटी ती निडरपणे सगळ्यांना भिडली.

वरळीच्या जांबोरी मैदानातून सुरुवात झालेला हा मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला. या जनआक्रोश मोर्चामुळे जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वर्कींग डे असल्याने शाळेतून सुटलेल्या आपल्या मुलांना घेण्यासाठी पालक स्कुल बस शोधत आले होते. संबंधित महिला देखील आपल्या मुलाला नेण्यासाठी वरळीतील परिसरात आली होती. मात्र, भाजपच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊन संबंधित महिलेला तिच्या मुलाची स्कुल बस दिसत नव्हती, जवळपास 1 तासापासून ती वाहतूक कोंडीत फसली होती, त्याच काळजीतून बस पुढे निघून जाते की काय? आपला मुलगा कुठे आहे? या काळजीतून संबंधित महिलेला राग अनावर झाला होता.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

मुलाच्या काळजीपोटी तिचा संताप अनावर झाला. त्यामुळे, केवळ बाई म्हणून नाही तर एका लेकराची आई म्हणून तिने कुणालाही न जुमानता परिस्थिती आणि संबंधित मोर्चातील नेतृत्वावर चिडचिड करत राग व्यक्त केला. विशेष म्हणजे, यासंदर्भात तिने पोलिसांकडेही जाऊन दाद मागितली होती, मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांकडेही आपलं गाऱ्हाणं मांडले होते. मात्र, कुठेच दाद मिळत नसल्याने तिच्या रागाचा पारा चढला आणि त्यातच मंत्रीमहोदयांना रोषाला सामोरे जावे लागले.

सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा…शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवालही महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. एवढी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला होता.

महिला संतापली! गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

महिला पोलिसाने गिरीश महाजन यांना विचारला जाब, सस्पेंड केलं तरी चालेल…

मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी उल्लेख चुकीचा! पहिलीच टर्म शेवटची ठरू शकते; गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा

तुम्ही पालकमंत्री म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत; गिरीश महाजन प्रकरणावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *