शरद पवार यांची राष्ट्रवादी लग्नाळू युवकासाठी सरसावली…

Share

मुंबईः अकोल्यातील एका युवकाच्या (वय ३४) ‘मला लग्नासाठी पत्नी मिळवून द्या’ या भावनिक साकड्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिसाद दिला आहे. शरद पवार यांचा पक्ष स्वतः वधू संशोधन करणार असून, त्याच्या लग्नाचा संपूर्ण खर्च देखील पक्ष उचलणार आहे.

शरद पवार 8 नोव्हेंबर रोजी अकोला दौर्‍यावर असताना त्यांना लग्नाळू युवकाने एक भावनिक पत्र दिले होते. त्यात त्याने लिहिले होते की, “माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. मी एकाकीपणामुळे त्रस्त झालो आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला तयार आहे. तिथे काम करून संसार नीट चालवीन, याची मी हमी देतो. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. तुम्ही मला जीवनदान द्याल. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही,” असे तरुणाने म्हटले होते.

संबंधित पत्रात त्याने स्वतःचा मोबाईल नंबर आणि पत्ता दिल्याने शरद पवार व व्यासपीठावरील नेते काही क्षण अवाक झाले होते. या पत्राची चर्चा सोशल मीडियावरही जोरदार झाली. अखेर पक्षाच्या वरिष्ठांकडून जिल्हा पदाधिकाऱ्यांना या युवकाला मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लग्नाळू युवकाचं शरद पवारांना साकडं; मला पत्नी मिळवू द्या, उपकार विसरणार नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *