भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; बळजबरी ठेवले शारीरिक संबंध…

Share

मुंबई : महिलेने केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणे तसेच धमकी देणे या प्रकारांशी संबंधित आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, जुलै 2022 मध्ये आरोपीने तिला मिरारोड पूर्व येथील आपल्या कार्यालयात बोलावले. लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केला असतानाही विविध ठिकाणी कार्यालय, लॉज तसेच इतर ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचाही उल्लेख महिलेने केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास मिरा रोड पोलिसांकडून सुरू आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी पक्षावर टीका करत संबंधित नगरसेवकावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *