अशोक खरात याच्याबाबत प्रणिती शिंदे यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य…

praniti-shinde
Share

सोलापूर: सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरात याच्याबाबत भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे. अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. शिवाय, त्याचं एन्काऊंटर का होऊ शकतं, याचं कारणंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं आहे. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे कनेक्शन उघडकीस आले आहेत. तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, संजय शिरसाट अशा मोठ्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आल्याने संबंधित राजकीय नेत्यांची देखील अडचण होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, मला तर असं वाटतंय की, अशोक खरातचा एन्काऊंटर करतील. कारण अनेक नावं समोर येणार आहेत. ज्यांच्याशी अशोक खरात जोडला आहे. सध्या जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत. त्यांचीही नावं समोर येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाबद्दल बोलतो, पण तुमचे विचारच महिलांच्या विरोधातले असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार? असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना चौकशीला कधी बोलवणार…

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकर यांची बहिण अन्…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *