मुंबई: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हालचाली तीव्र झाल्या आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची चाहुल असून, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेले ‘नाट्य’ अद्याप संपलेले नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. २०२२ मध्ये शिवसेनेतील मोठ्या बंडांनंतर आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी तूर्तास ‘ऑपरेशन टायगर’ऐवजी ‘ऑपरेशन तुतारी’ सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचे खासदार शिंदेच्या रडारवर आले असून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हालचाली तीव्र झाल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून ४० आमदार आणि काही खासदारांसह भाजपच्या साथीने राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. त्यातून महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर काही महिन्यांतच अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडखोरी करत सरकारमध्ये सहभाग नोंदवला. या दोन मोठ्या धक्क्यांमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. आता तोच पॅटर्न पुन्हा राबवला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपासून ते ऑपरेशन टायगर-तुतारीची चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची तातडीने बैठक बोलावली होती. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतरच शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेल्या एका विधानाने या चर्चेला अधिक बळकटी दिली आहे. वाघमारे यांनी सूचक वक्तव्य केले होते. विरोधकांच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे.