अकोला : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार अमोल मिटकरी हे शोकाकुल असून सातत्याने दादांच्या आठवणी जागवत आहेत. आता, अमोल मिटकरी यांनी व्हॅलेंटाईन डे (Valentine day) निमित्ताने पत्र लिहित अजित दादांना लव्ह यू म्हटले आहे. तसेच, भविष्यात माझ्या ताटात काय वाढून ठेवले हे सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्या व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. राजकीय कार्यकर्तेही आपल्या नेत्यावर जीवापाड प्रेम करत असतात. मात्र, उद्याचा ‘व्हॅलेंटाईन डे’ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा दिवस असणार आहे. कार्यकर्त्यांच्या याच अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे ती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी. मिटकरींनी कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त एका जाहीर पत्रातून व्यक्त केल्या आहेत. या पत्रात अजित पवार जाण्याचे दुःख हे न पचण्यासारखं असल्याची भावना आमदार मिटकरींनी व्यक्त केली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अमोल मिटकरींचं पत्र जसच्या तसं पुढीलप्रमाणे…
तिर्थरूप आदरणीय दादा.. ‘नमस्कार’….!
“माझे बुडविले घर । लेकर बाळे दारोदार ।
लावली काहार । तारातीर करोनी ।।”
आदरणीय दादा,
आज व्हॅलेंटाइन डे! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती प्रेमळ भावना व्यक्त करण्याचा जागतिक प्रेम दिवस ! तुम्ही असताना प्रेम व्यक्त करण्याच मी हिंमत करू शकलो नाही, मात्र तुम्ही नसताना आज या पत्ररूपी शब्दपपंचातुन ती व्यक्त करावी वाटतेय!
तुम्ही दिवंगत झालात या शब्दावर माझा तरी विश्वास नाहीये. हा माझा वेडेपणा असेल पण माझं मन मानायला तयार होणार नाही. तुम्हीच मला २०१९ ला ऐकलं, पक्षात घेतलं, आणि जबाबदारी दिली, हवाई प्रवासात फिरवलं, आमदार केलं, घर उभारून दिलं. इज्जत दिली, राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. इतकंच नव्हे तर विदेशात पाठवले, वडिलांच दुःख विसरून ‘कामाला लावलं. शिस्त लावली, कामात रमण्याचा पाठ दिला, सगळं सगळं दिलं. अनेकांना अमोल मिटकरी हा अप्रिय वाटणारा. मात्र छोट्या समुहातील हा व्यक्ती तुम्हालाच प्रिय वाटला. यापूर्वी वडिलांना आवडलो मात्र त्यानंतर तुम्हालाचं प्रिय वाटला. पूर्वीही परिवाराने, समाजाने, नातेवाईकांने दुर लोटलं. परिवारात प्रेमाने बोलणारी आणि माझी वाट पाहणारे फक्त 4-5 माणसे. तेही माझ्यापेक्षा लहान. मी वाईट नसतांना वाईट ठरवला गेलो, पण दादा तुम्हीच मला समजून घेतलं. अनेकदा चुकलो, तुम्ही चुका दुरुस्त करून पुढं जायला शिकवलं. वाढदिवस असला की पहिला फोन तुमचा, सुख-दुःखात खबीरपणे पाठीशी फक्त दादा तुम्हीच!
तुमच्या नावावर माझी प्रशासकीय ‘दादागिरी चालायची. तुमच्या नावावर जहागिरीदारी करत आलो. मला आमदार केल्याचा किस्सा आणि शप्पथ होईपर्यतची
आश्यर्यकारक घटना व परिस्थिती आपल्यालाच मलाचं माहित होती. माझ्या गावाला मला आपल्यामुळं उजेडात आणता आलं. आपल्यामुळं गाव, परिवार, निसर्ग, शहर, जनता, पशुपक्षी, खेळ आदींवर प्रेम करायला शिकलो. शिवशाहू-फुले-आंबेडकर आपली श्रद्धा व विश्वास हा तुमच्यातील व माझ्यातील समान दुवा होता. स्वराज्यरक्षक या मुद्द्यावरील आपली भूमिका अवघ्या महाराष्ट्राने बघितली. ‘कुणीही जिवाचा न घडो मत्सर’ हा संत विचार तुम्ही जगलात व “जो जे वांछील तो ते लाहो” हा पसायदान स्वभाव तुम्ही अंगिकारला, हेचं तुमचं वेगळंपण!
भीमा कोरेगावला दरवर्षी न चुकता अभिवादन करीत स्वाभिमानाने ‘जयभीम’ म्हणणारा तो करारी आवाज आज कानावर पडणार की नाही याची सल कायम चर्चेत टोचत राहणार! शिववेषात आलेल्या व्यक्तीला आपण घातलेला मुजरा, मुस्लिमांबद्दल असलेले प्रेम व जिव्हाळा सगळं सगळं आज हरवलं. आज माझ्याजवळ खुप काही आठवणी सांगण्यासारख्या असूनही काहीच सांगण्यासारखं नाहीये. ‘व्हॅलेंटाइन-डे’ हा तुम्हाला जनतेनं दिलेला आवाज ”लव्ह यु’ दादा….., दादा आय लव्ह यु. ‘आज खूप मिस करतोय दादा’…
भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही. जीवनाचा शेवटचा दिवस गोड व्हावा हे प्रत्येकाला वाटतं, मात्र तुमच्या नशिबी तेही आलं नाही. सुखाच्या क्षणापेक्षा निंदानालस्ती देवानं दिली. आज एकादशी आहे, तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या अधिक प्रेमात पडलो, मात्र त्याने याच दिवशी तुम्हाला छेडलं. तो विठ्ठल आता सुटलाय… त्याच्याशी आयुष्यभर भांडण कायम राहील!
जय शिवराय.. जयभिम… जय महाराष्ट्र…
आपलाच,
अमोल मिटकरी.
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…