धाराशिव: माजी मंत्री तानाजी सावंत यांचे ऐन मतदानादिवशी पैसे वाटपाबाबत कथित ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कोटी-दोन कोटी खर्च करण्यासही हरकत नसल्याचे स्पष्टपणे ऐकू येत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पैशाबाबतची चर्चा थेट व्हॉट्सॲपवर करण्याचे निर्देश कार्यकर्त्याला देण्यात आले असल्याचे ऐकू येते. “पैशावर किती मतदार घेता येतील, हिंगणगावमध्ये किती शक्यता आहे, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका,” अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
फक्त गोडगोड बोलून उपयोग नाही, प्रत्यक्ष काम दाखवण्यावर भर द्यावा, असे सांगत मुस्लिम आणि दलित वस्त्यांतील मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे या ऑडिओत ऐकू येते. “दोन घेऊ, तीन घेऊ, कोणी चार घेऊ,” अशा शब्दांत मतदारांवर पैशांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या संभाषणातून पुढे येतो. शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही, तिथे कोणताही कॉम्प्रमाईज करायचा नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याचे या क्लिपमध्ये नमूद आहे. “50 लाख जावो, कोटभर जावो, दोन कोटी जाऊ देत,” असे म्हणत खर्चाच्या मर्यादेची कोणतीही अडचण नसल्याचे कथित विधान या ऑडिओत ऐकू येते. संवेदनशील मतदारसंघ असल्याचे सांगत कोणाचाही विचार न करता याद्या तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. कोणाशीही चर्चा न करता, एक शब्दही बाहेर न जाता सर्व माहिती फक्त व्हॉट्सॲपवर पाठवण्याचे आदेश दिल्याचेही या संभाषणात ऐकू येते.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका, लागेल ते मला सांगा, मी बरोबरच आहे, असे सांगत संपूर्ण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर या क्लिपची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला…
रोहित पवार यांचे राष्ट्रवादी अन् सुनित्रा काकींविषयी मोठं वक्तव्य…
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेली ‘दुसरी पत्नी’ अडचणीत…