संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; शरद पवार…

sambhaji-bhide
Share

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा राजकीय वक्तव्य केल्याने नवा वाद उद्भवला आहे. शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. शरद पवार यांच्याबद्दल आणखी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

संभाजी भिडे यांची धारातीर्थी यात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिमसाठी सुरू आहे. यावेळी, यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि ***खोर आहेत, अशा शब्दात संभाजी भिंडेंनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे, भिडे यांच्या या वादग्रस्त विधानाने वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील लवासाची अशी कीड काढून टाकली पाहिजे, असेही भिडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शरद पवार साहेबांना राष्ट्रद्रोही म्हणणे हे अतिशय चुकीचे आहे. शरद पवार साहेब हे या देशासाठी, महाराष्ट्रासाठी झिजणारं नेतृत्व आहे. त्यामुळे, अशा पद्धतीने देशद्रोहाचा आरोप लावणे एकदम चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *