अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले तोंडभरून कौतक…

amruta-fadnavis
Share

मुंबई: राज्यातील 29 महापालिकांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असताना भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे. मुंबईत 45 वर्षात पहिल्यांदाच भाजप मुंबई महापालिकेत सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतक केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, विजयाने खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने ज्याप्रकारे प्रदर्शन केलं, ते पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता ते नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात भाजपने हा मोठा विजय मिळवला आहे. ज्याचा मला खूप आनंद आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

महायुतीने हे सिद्ध केलं आहे की या युतीचे नेते हेच महाराष्ट्रातील खरे नेते आहेत आणि ते फक्त आणि फक्त राज्याच्या विजयासाठी काम करत आहेत. तसेच, लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत किती प्रभाव पडला यावर बोलताना त्या म्हणाल्या, निश्चितच राज्यातील बहि‍णींनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या पक्षात मतदान केले. राज्यातील तरुणांनी देखील विकासासाठी मतदान केले. तरुणांनी गुड गव्हर्नंस आणि विकासाच्या नावावर मतदान केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे इंफ्रा मॅन (विकास पुरुष) आहेत. त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गाची जबाबदारी घेतली आहे, हेच त्यांच्या कामातून दिसून येते. ते समाजाच्या अनेका मुद्द्यांना सोबत घेत चालतात त्यामुळेच आज ते एक बडे नेता आहेत. भाजपला आज तो प्रतिसाद मिळाला आहे तो राज्याच्या कॉमन मॅनच्या अपेक्षांचे प्रतिक आहे. पक्ष मुंबईकरांच्या गरजा समजून घेईल आणि त्यासाठी प्लॅनिंग करुन विकास कार्य करतील, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *