मोठी बातमी! तेजस्वी घोसाळकर यांनी मैत्रिणीच्या विरोधात लढवली निवडणूक अन्…

tejaswi-ghosalkar
Share

मुंबई : मुंबईच्या दहीसरमधील फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबात राजकीय फूट पडली. तेजस्वी घोसळकर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात केला आणि दहीसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे, दहीसर वार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीकडे मुंबईचे लक्ष लागले असून तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध शिवसेनेने त्यांच्याच मैत्रिणीला मैदानात उतरवले होते. तेजस्वी घोसाळक या मोठ्या मतांनी विजयी झाल्या आहेत.

भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीअखेर तेजस्वी घोसाळकर यांना 11,964 मतं मिळाली होती. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या धनश्री कोलेगे यांना 4115 मतं मिळाली होती. दहीसरच्या वार्ड 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांना 10755 मतांनी विजय मिळाला असून त्यांना एकूण 16,484 मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांनी 5729 मतं घेतली आहेत.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणी सदस्य असून दहीसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार आहेत. येथील वार्डमध्ये शिवसेना कार्यकर्ती म्हणून त्यांचं काम आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले होते. विनोद घोसाळकर यांना सुनेनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते.

तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली, त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आणि मोठ्या फरकाने विजयही मिळवला.

तेजस्वी घोसाळकर करणार भाजपामध्ये प्रवेश; भावूक पोस्टमध्ये सांगितलं कारण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *