पुणे (संदिप कद्रे): पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक ४० (कोंढवा-येवलेवाडी) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा कवडे यांनी ईव्हीएम (EVM) मशीनबाबत गंभीर आरोप केले आहेत.
मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार (Tampering) करण्यात आल्याचा संशय सुरेश उर्फ बाळा कवडे यांनी व्यक्त केला आहे. या आरोपांनंतर मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आणि प्रक्रियेत अडथळे आले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सुरेश लक्ष्मण कवडे यांनी प्रभाग ४० (अ) मधून निवडणूक लढवली आहे. मशीन “सेट” केल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आपला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.