पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच हडपसर परिसरात अजित पवारांच्या उमेदवाराकडून टॉर्चर होत असल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत ाहेत.
प्रभाग क्रमांक ४१ मधील सादिक उर्फ बाबू कपूर (वय ५६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात सादिक यांनी मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काही नावे लिहिली होती, तसेच घटनास्थळावरून ३० पानांची सविस्तर सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तींचा सविस्तर उल्लेख केला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
प्राथमिक माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर येथील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांच्यात जुना वाद सुरू होता. या वादातून फारुख शेख हे सादिक यांना मानसिक त्रास देत होता, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये असल्याचे समजते. “फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे,” असे सादिक यांनी नमूद केले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
लष्कर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सुसाईड नोटमधील नावांच्या आधारे तपास सुरू केला आहे. सुसाईड नोटमध्ये फारुख शेख यांच्यासह इतरही काही बड्या व्यक्तींची नावे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आत्महत्या केलेला सादिक उर्फ बाबू कपूर याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती. पुणे महानगरपालिका निवडणुकीत हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.