पिंपरी-चिंचवड! दोन दिग्गज युवा नेतृत्वाचं पक्षविरुद्धच बंड यशस्वी होणार का?

bapu-katale-priyanka-ghojge
Share

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 हा क्षेत्रफळाने तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने ही मोठा मानला जातो. जवळपास 75 हजार मतदान असलेल्या या प्रभागाकडे सर्व पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडी नंतर दोन दिग्गज नेत्यांची बंडखोरी हा प्रभागामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपमधून बंडखोरी करून काँग्रेसवासी झालेल्या प्रियंका घोजगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून धक्कादायक रित्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करून आलेले बापू कातळे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निष्ठावान कार्यकर्ते असलेले बापू कताळे यांना उमेदवारी नाकारली म्हणून हे बंड झालं की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना (शिंदेगट) पक्षाने बापू कताळे यांच्या पत्नीस प्रभाग क्र.16 (क) मधून सर्वसाधारण महिला गटाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. या मुळे तरुण चेहऱ्याला न्याय मिळाला असे बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे दोन्ही दिग्गज नेते अनेक वर्षापासून प्रभाग.क्र 16 च्या दोन विविध भागांमध्ये सातत्याने काम करत असल्याचे पहावयास मिळते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका घोजगे यांच्या अनेक पक्षविरहीत सामाजिक उपक्रमांमध्ये बापू कातळे यांची उपस्थिती अनेक वेळा पहिला मिळालेली आहे. दोन्हीही नेत्यांची बंडखोरी अचानकपणे झाल्याने व दोन्हीही नेते वेगवेगळ्या पक्षात गेल्याने प्रभागामध्ये चर्चा रंगली आहे. थेट पाहायला गेल्यास दोन्हीही राजकीय नेते हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी नाही. प्रियंका ताई घोजगे यांचे साईनगर-मामुर्डी परिसरात प्राबल्य आहे. तर बापु कताळे यांचे विकासनगर, किवळे परिसरात वर्चस्व आहे. दोन्हीही नेते मुसद्दी असल्याने धक्का राजकारणामध्ये माहीर असून नवीन पक्षात असल्यामुळे पक्षाच्या पॅनल बरोबर प्रामाणिक राहतील ? की “एक तेरा एक मेरा ” अशी छुपी युती करून. निकालाच्या दिवशी वाजत गाजत महानगरपालिकेच्या दालनात जातील याकडे प्रभागाचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळामध्ये दोघांकडेही सहानुभूतीच्या नजरेत न बघितलं जात असून, मतदार राजाचाही त्यांना ग्रीन सिग्नल आहे. येत्या काळात त्याचा फायदा दोन्ही पॅनलला होण्याची ही शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *