नवी दिल्ली : पंजाबच्या जालंधरचे शिवसेना नेते दीपक कंबोज यांच्या मुलीचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बाथरूममध्ये गीजर लिक झाल्याने श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक समोर आला आहे. लेकीच्या वाढदिवसाची घरात जय्यत तयारी सुरू असतानाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मुनमुन असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. नववर्षाचा पहिलाच दिवस आणि तिचा वाढदिवस असल्याने घरात त्याची जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईक, मित्रपरिवाराला बोलवण्यात आले होते. मुनमुन अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली त्यावर शॉवरसाठी गीझर सुरु केला. त्यावेळी गीझरच्या पाईपमधून गॅस पाईप लीत झाला. गॅस लीक झाल्याने बाथरुममध्ये श्वास गुदमरला आणि जीव गेला. बराच वेळ अंघोळीसाठी मुनमुन बाहेर न आल्याने घरच्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाज तोडण्याच आला. त्यावेळी बेशुद्ध पडलेल्या मुनमुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुनमुनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मुनमुनवर किशनपुरा स्मनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
मुनमुनचे पिता दीपक कंबोज म्हणाले, आमच्या कुटुंबाने वाढदिवस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु आनंदाचे वातावरण अचानक शोकात बदलले. मुनमुन अतिशय मनमिळाऊ स्वभावाची मुलगी होती. तिच्या या स्वभावामुळे घरात नेहमी वातावरण आनंदाचे असायचे.