मोठी बातमी! भाजपचा सर्वात मोठ्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत…

Share

मुंबई : नगरपालिका निवडणुकीला एकाच घरातील 6 उमेदवारांना तिकीट देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी नवा पॅटर्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या मुलास किंवा पत्नीस उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयाचे सोशल मीडियासह नागरिकांमधून स्वागत होत आहे.

महापालिका निवडणुकीत भाजप आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच मुलं, पत्नी वगैरे त्यांना तिकीट देण्यात येणार नाही. नाशिकमधील आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मुलांचे अर्ज माघारी घेतले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलानेही उमेदवारी अर्ज भरला होता, तो देखील मागे घेतला आहे. कृष्णराज महाडिक यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राज्य पातळीवर नेत्यांच्या घरात उमेदवारी न देण्याचा भाजपचा निर्णय झाला असल्याने कृष्णराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पक्षाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, असे म्हणत धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षाचा महापालिका निवडणुकीसंदर्भातील निर्णयच सांगितला आहे. पण, दुसरीकडे भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भाऊ आणि वहिनीला उमेदवारी दिली आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या आहे. मात्र, आम्ही त्यांना दोन दिवसात समजावून सांगू. महायुतीची सांगडं घालताना अनेकांवर अन्याय झाला हे मान्य मात्र त्यांची समजूत काढू, असे म्हणत खासदार धनजंय महाडिक यांनी नाराजांची समजूत काढण्याचे ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *