चंद्रपूरः नृत्यांगना गौतमी पाटील हिने मूल शहरात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य रोड शो केला. या प्रचार रॅलीला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गौतमी पाटील यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात नृत्यांगणा गौतमी पाटील हिने काँग्रेसच्या महिला उमेदवारांसाठी प्रचारात आघाडी घेतली. नाकात नथणी, गळ्यात गमछा परिधान करत तिने चाहत्यांना आवाहन केले. ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मूल नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काहीजण सेल्फी घेण्यासाठीही पुढे सरसावले होते. गौतमी पाटील म्हणाली, प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. दरवेळी प्रेम मिळते, पण यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. महिला वर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती. गौतमी पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांचे आभार मानत, निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असल्याचे सांगितले.
दरम्यान, राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावल्या असून, 2 डिसेंबर रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या पूर्वसंध्येला प्रचाराला अधिक गती मिळाली आहे.