मुंबईः बदलापूरमध्ये शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील तब्बल सहा जणांना एकाचवेळी उमेदवारी मिळाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आणि सोशल मीडियावरूनही टीका होऊ लागली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि भाजपने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. आता एकाच घरात केवळ दोघांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
बदलापूरमध्ये वामन म्हात्रे, त्यांची पत्नी, भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण आणि पुतण्या भावेश अशा सहा नातेवाईकांना तिकीट देण्यात आले. 2015 मध्येही त्यांच्या घरातील चार जणांना उमेदवारी मिळाली होती. यामुळे या वर्षी मिळालेल्या सहा तिकिटांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. अनेकांनी उघडपणे घराणेशाहीचा आरोप करत शिंदेसेनेवर टीकास्त्र सोडले होते.
वामन म्हात्रे प्रकरणानंतर या सर्वांचे राजकीय गणित गुंतागुंतीचे झाले असून, पक्षांतर करून तिकीट मिळवू पाहणाऱ्यांनाही आता मर्यादांचा धक्का बसणार आहे. त्यामुळे स्वतः, पत्नी, मुलगा, सून, जावई अशा गोतावळ्याला उमेदवारीसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येते.