इंदुरीकर महाराज नवीन व्हिडीओमध्ये म्हणाले; काय बोंबलायचंय बोंबला, आता तर…

indurikar-maharaj-daughter
Share

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेमुळे इंदुरीकर महाराज यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. त्यानंतर आता इंदुरीकर महाराज यांचा आणखी एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या साखरपुड्याचा व्हिडिओ, फोटो व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या पेहरावावरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या टीकेमुळे कंटाळलेल्या इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तनसेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले. यानंतर 10 नोव्हेंबर रोजीचा बदगी येथील कीर्तनातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराजांनी लग्न जोरात करणार…काय बोंबलायचंय बोंबला असे म्हटले आहे. तसेच एकीकडे 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटीचा खर्च होतो, तेव्हा कोणत्याही चँनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारुन दाखवावे, असेही इंदुरीकर महाराज बोलताना दिसत आहेत.

इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आले होते. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या साखरपुड्यावरुन सोशल मीडियावरुन अनेकांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर निशाणा साधला होता.

इंदुरीकर महाराज ट्रोलिंगने हैराण; कीर्तन सोडण्याचा निर्णय…

इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर…

Video: इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा थाटात साखरपुडा, काय करतो होणारा जावई, नेटीझन्सची टीका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *