संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या ‘मनुवादी’ भाजपचा तीव्र निषेध

Share
नाशिक: प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासावर काळी छाया पाडली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात या देशात लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे टाळले. संविधान निर्मात्यांचा उल्लेख न करणे हा बाबासाहेबांचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे.
भाजपची ही वृत्ती आता उघड झाली आहे. एका बाजूला तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तींना सत्कार केला जातो, तर दुसऱ्या बाजूला संविधान निर्मात्यांचा अपमान होतो. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित केले जाते, तर डॉ. आंबेडकरांचा अपमान सहन केला जातो. याचा अर्थ असा की, या मनुवादी भाजपला लोकशाही आणि संविधान मान्य नाही.
या अन्यायाविरुद्ध वनविभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी आवाज उठवला, हा धाडस कौतुकास्पद आहे. सरकारने त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणे टाळावे; अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेचा रोष सरकारला सहन करावा लागेल.
गिरीश महाजन आणि महाराष्ट्रद्रोही भाजपचा त्रिवार निषेध!
जय भीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *