वरिष्ठांनी परवानगी दिली तर एकनाथ शिंदेच अस्तित्व संपवू; गणेश नाईक

Share

प्रताप सरनाईक यांचा जोरदार पलटवार

नवी मुंबई: नवसाचा गणपती ठाण्यात भेट दिलेल्या गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या टीकेला शिंदेंच्या जवळच्या माणसाने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

गणेश नाईक यांनी नुकतीच एका कार्यक्रमात “वरिष्ठांनी परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंच अस्तित्व संपवू” अशी वक्तव्य केली होती. या भाष्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, “कुणी कितीही वल्गना केल्या तरी एकनाथ शिंदे समर्थ आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी तो भक्कम केला. बोलणं सोपं असतं, मात्र शिंदेंनी विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत करून दाखवलं. शिवसेना राज्यात नंबर दोनचा पक्ष आहे.”

दरम्यान, गणेश नाईक यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाचे पालन करत आपल्या विधानाची पुष्टी केली. “भारतीय जनता पक्ष शिस्तीचा आहे, म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटत नसतानाही कार्यकर्त्यांनी ते सहन केलं आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्याच वेळी, ठाण्यातील महागणपती मंडळाला भेट देताना नाईक म्हणाले, “सातत्याने मी तीन वर्षापासून या ठिकाणी येतोय, त्यामुळे नवसाचा गणपती म्हणायला हरकत नाही. महापालिका आणि नगरपालिका ही कार्यकर्त्यांची असते; एकदा त्यांना लढू द्या, लढल्यानंतर ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर करा.”हा वाद नवीन मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *