पुणे: महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ईशा योग केंद्रात सद्गुरू स्वतः ‘योगेश्वर लिंगाला’ महाअभिषेक करणार आहेत. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात जगभरातील साधकांना भगवान शिव अर्थात आदियोगीची कृपा प्राप्त करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हा सोहळा विनामूल्य ऑनलाइन प्रक्षेपणाद्वारे (Livestream) जगभरात पाहता येणार आहे.
सद्गुरूंच्या मते, “महाशिवरात्री ही आध्यात्मिकदृष्ट्या वर्षातील सर्वात प्रभावशाली रात्र असते. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे मानवी शरीरात ऊर्जेचा नैसर्गिक प्रवाह उर्ध्वगामी होतो. आदियोगी शिवाला अर्पण करण्यासाठी हा सर्वात शक्तीशाली काळ आहे.”
यावर्षी प्रथमच सद्गुरूंच्या हस्ते योगेश्वर लिंगाला ‘महाअभिषेक’ अर्पण केला जाईल. पवित्र मंत्रोच्चार आणि अर्पणाद्वारे होणारा हा दुर्मिळ विधी साधकांना आदियोगींच्या ‘योगेश्वर’ स्वरूपाशी जोडण्यास मदत करेल. या प्रक्रियेमुळे भाविकांना शिवाची कृपा प्राप्त होऊन त्यांची आध्यात्मिक साधना अधिक गहन होण्यास मदत होईल
या महाअभिषेकात सहभागी होण्यासाठी कोणतीही आध्यात्मिक पार्श्वभूमी किंवा अनुभवाची अट नाही. जे भाविक कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात उपस्थित राहू शकत नाहीत, ते घरबसल्या विनामूल्य लाईव्हस्ट्रीमद्वारे या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेऊ शकतात.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांना sadhguru.co/ylmmrt या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव आणि जन्मतारीख नोंदवून विनामूल्य नोंदणी करता येईल. 8300083000 वर मिस्ड कॉल देऊनसुद्धा तुम्हाला नोंदणी करता येईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर भाविकांना कार्यक्रमाची लिंक आणि पुढील सूचना पाठवल्या जातील.
ईशा योग केंद्रात दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त एकत्र येतात. रात्रभर चालणाऱ्या या उत्सवात संगीत, ध्यान आणि शक्तिशाली प्रक्रियांचे आयोजन केले जाते. तसेच, उपस्थित जनसमुदायासाठी ‘महाअन्नदान’ (प्रसाद भोजन) देखील केले जाते. महाअभिषेक प्रक्रिया पूर्णपणे मोफत असली, तरी भाविक महाशिवरात्रीच्या विविध उपक्रमांसाठी आणि अन्नदानासाठी स्वइच्छेनुसार देणगी देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी, कृपया +91 99202 82290 या क्रमांकावर संपर्क साधा
किंवा west.mediarelations@ishafoundation.org यावर ईमेल करा.
मुंबईत सद्गुरु दिवसभराचा प्रगत-ध्यान कार्यक्रम आयोजित करणार…

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949