अजित पवार यांचा एकेरी उल्लेख, आम्ही काय बांगड्या घातल्यात का…

ajit-pawar
Share

पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला. त्यानंतर संतापलेल्या लांडगे यांनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको, असे एकेरी भाषेत लांडगे यांनी टीका केली आहे.

महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत, अशी जहरी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली होती त्यावर अजित पवार यांनी चार शब्दांत विषय संपवला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा लांडग यांनी अजित पवारांना डिवचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असे म्हटले अन् संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले. आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होणारेत असे म्हणत भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असा निशाणा साधला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी महेश लांडगे यांचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला. त्यानंतर संतापलेल्या लांडगे यांनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको, असे एकेरी भाषेत लांडगे यांनी टीका केली आहे. आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आलीये, असा इशारा ही महेश लांडगे यांनी थेट अजित पवार यांना दिला आहे. आपले देवा भाऊ शांत बसतात, पण एखाद्याला इशारा देतात. त्याला तो इशारा समजला की मग 70 हजारांचा घोटाळा करणारे पण आपले घोटाळा काढणारे जमा होतात, असे ही लांडगे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवारचं महाराष्ट्राचे आका आहेत. अशी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा. मुळात ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे असे महेश लांडगे म्हणाले. मला पिंपरी चिंचवडचा ते आका म्हणतायेत, मुळात तेच महाराष्ट्राचा आका आहेत असा पलटवार करत एकेकाळचे वस्ताद असलेल्या अजित दादांना पैलवान महेश लांडगेंनी कुस्तीचं आव्हान दिले आहे.

अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका अन् भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *