पुणे: महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं पुण्यात ऑपरेशन लोटस राबवले असून, भाजपमध्ये अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. यात पुण्यातील विविध पक्षाचे अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा मेगा प्रवेश होणार आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास नाना दांगट आणि दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे यांचाही भाजपात प्रवेश होणार आहे. याशिवाय माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील २२ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रमेश वांजळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या मृत्यूनंतरही वांजळे कुटुंब कायम मनसेत राहून काम करत होते. पण, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रमेश वांजळे यांची लेक सायली वांजळे भाजप मध्ये प्रवेश करत आहे. हा पुण्यात मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय भाजपनं इतर पक्षांना देखील धक्के दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात रविवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रवेश होणार असून, पुण्यातील भाजपचे नेतेही या वेळी उपस्थित राहणार आहेत.