चर्चांना उधाण! बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा कोणाला जास्त मतं पाहा…

kaluram-chaudhari-baramati
Share

पुणे: राज्यातील नगरपरिषदेच्या या निकालांमध्ये बारामतीचा निकाल अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती नगरपरिषदेतील 41 पैकी 35 जागांवर विजय मिळवला आहे. उर्वरित सहा विजयी उमेदवारांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या संघमित्रा काळूराम चौधरी यांचा समावेश आहे.

नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत काळूराम चौधरी यांना 6652 मते पडली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला 5053 मते पडली. बारामती नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 अ मधून काळूराम चौधरी यांची लेक संघमित्रा चौधरी यांनी विजयाचा गुलाल उधळला. काळूराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पवारांच्या बारामतीत थेट पवारांनाच अंगावर घेण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. अखेर बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर त्यांची लेक संघमित्रा चौधरी यांनी वयाच्या 22 व्या वर्षी बारामती नगर परिषदेत पाऊल ठेवले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

काळूराम चौधरी आणि त्यांची लेक संघमित्रा चौधरी दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे मुद्द्याचं बोलून पवार कुटुंबाला ते नेहमीच अडचणीत आणतात. आत्ताही बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ज्यांना राहायला घर नाही, त्यांना मी वन बीएचके घर देईन’, अशी घोषणा करून ते महाराष्ट्रात चर्चेत आले होते. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी संघमित्रा आणि काळूराम चौधरी यांच्यासाठी प्रचार केला होता. बारामतीतील वंचित वर्गांनी आणि बहुजन वर्गाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना मतदान केले. अगदी शरद पवार यांच्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापेक्षा काळूराम चौधरी यांना जास्त मते पडली आहेत. चौधरी पिता-लेक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पुरून उरले. त्यामुळे या विजयाची राज्यभरात चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *