विद्यार्थिनींनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून जेएनयूचे प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजाम बडतर्फ

Share

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने लैंगिक छळाच्या एका प्रकरणात महत्त्वपूर्ण कारवाई करत एका प्राध्यापकाला बडतर्फ केले आहे. जेएनयूतील अकरा विद्यार्थिनींनी प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सामाजिक विज्ञान विद्याशाखेतील सामाजिक प्रणाली अभ्यास केंद्राचे प्रा. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप असल्याच्या आधारावर अंतर्गत समितीने चौकशी केली होती.

दरम्यान, अंतर्गत समितीच्या अहवालानुसार, विद्यापीठाच्या सामाजिक विज्ञान विद्याशाखेतील सामाजिक प्रणाली अभ्यास केंद्राचे प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजाम यांना विद्यापीठाच्या सेवेतून तात्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!