अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर दुःखाचा डोंगर कोसळला…

gitatai-hinge-gadchiroli
Share

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे पाचगाव येथे रविवारी (ता. ७) झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या घटनेमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गीताताई हिंगे या रविवारी खाजगी कामानिमित्त नागपूरला गेल्या होत्या. रात्री गडचिरोलीकडे परत येत असताना पाचगाव परिसरात त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडकली. यावेळी झालेल्या अपघातात गीताताई हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

गीताताई हिंगे या मूळच्या भाजपच्या सक्रिय पदाधिकारी होत्या. त्यांनी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्ष व जिल्हा महामंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. नगरपरिषद निवडणुकीआधी भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आणि पक्षात दाखल होताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

गीताताई हिंगे यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्याने एक जिद्दी, सक्रिय आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे. राजकीय कामात तत्परता, जनसंपर्कात सहजता आणि सामाजिक उपक्रमांतील बांधिलकी यामुळे त्या जिल्ह्यात लोकप्रिय होत्या. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *