धाराशिव : तुळजापूरमध्ये राजकीय कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी आणि गोळीबाराची घटना घडली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात ही हाणामारीची घटना घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन गटातील या राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावत जमाव पांगवला आहे.
गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भाजप उमेदवार पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीच्या ऋषी मगर यांच्यात वाद निर्माण झाला होता. अगोदर हा वाद मिटला होता. मात्र त्यानंतर पुन्हा या वादाला हिंसक वळण लागून यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर हल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. कुलदीप मगर यांच्या मानावर चाकूने, कोयत्याने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती, दरम्यान त्यांना रात्रीच उपचारासाठी सोलापूरला हलवले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. अशातच या दोन गटातील राड्यानंतर तुळजापुरातील राजकीय वातावरण अजून तापल्याचे बघायला मिळते आहे.